Aditit Tatkare list लाडकी बहिण योजनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत मतांचा जोगवा पदरात पाडून घेतल्यानंतर आता महायुती सरकारने योजनेत अटीशर्थीचा खोडा घालायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
सर्वेक्षण करून इतर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तसेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा अधिक आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेतून लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे या योजनेस मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरणार आहेत. Aditit Tatkare list
योजना गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “शेतकाम करणारी महिला, झाडूपोछा करणारी महिला, धुणीभांडी करणारी महिला, स्वयंपाक काम करणारी महिला, झोपडपट्टीतील महिला, भाजीपाला विक्री करणारी महिला या महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली होती.” असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
Pm किसान आणि Nano शेतकरी सन्मान निधी योजना आणि लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या ६.५ लाख महिलांना लाडकी बहिण योजनेतून या पुढे केवळ ५०० रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे.योजनेत पात्र झालेल्या महिलांना नवीन आधार जोडणी केलेल्या लाभार्थी महिला यापुढे जुलैपासून लाभास पात्र ठरणार नाहीत. तर अर्ज मंजूर झालेल्या पुढच्या महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे. Aditit Tatkare list
लाभार्थीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त असेल तर लाभ देण्यात येणार नाही.त्यासाठी आयकर विभागाकडून आयकर भरणाऱ्या महिलांची माहिती घेण्यात येणार आहे. आयकरसोबत इतर मार्गानेही एखादी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे.
लाभार्थी महिलांच्या नावांची फेरतपासणी जिल्हा पातळीवर करण्यात येणार आहेत.२०२४ च्या जुलै महिन्यापासून राज्यात लाडकी बहिण योजना राबवण्यात आली. यामध्ये आत्तापर्यंत २५ हजार २५० कोटी रुपयांचे वाटप महिलांच्या खात्यावर करण्यात आले. परंतु आता मात्र या योजनेचा लगाम आवळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
२ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र झाल्या. परंतु अद्यापही ११ लाख महिलांच्या अर्जाची तपासणी आहे. तर ११ लाख अर्जाचं आधार लिंक रखडलेलं आहे.तसेच राज्य सरकारने अलीकडेच ५ लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र केलं आहे. तर संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहिण योजना या दोन्हीचा लाभ घेणाऱ्या २ लाख ३० हजार महिलांनाही लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आलं आहे.
‘माझी लाडकी बहीण’ योजनेत अलीकडे काही महत्त्वपूर्ण बदल आणि नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या बदलांचा उद्देश योजना अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
🔹 नवीन पात्रता निकष आणि अटी
- वयाची अट: लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
- उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- दस्तऐवज सुलभता: अधिवास प्रमाणपत्राऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक दस्तऐवज ग्राह्य धरले जाईल.
- शेतीची अट रद्द: पूर्वीची 5 एकर शेतीची अट आता रद्द करण्यात आली आहेउत्पन्नाचा दाखला: पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही
- विवाहित महिलांसाठी सवलत: परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असल्यास, त्यांच्या पतीचे अधिवास संबंधित दस्तऐवज ग्राह्य धरले जातील.
- अर्जाची मुदतवाढ: अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
🔹 लाभाच्या रकमेत बदल
- ज्या महिलांना ‘पीएम किसान’ किंवा ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजनेचा लाभ मिळतो, त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा ₹500 इतकीच रक्कम मिळेल. इतर पात्र महिलांना ₹1,500 मिळणार आहेत.
🔹 गैरवापरावरील कारवाई
- तपासणीत असे आढळले की, 2,652 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून एकूण ₹3.58 कोटींची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
🔹 अर्ज प्रक्रिया
- महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्रे, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये यांचा वापर करता येईल.अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/