Cibil Score Check

Cibil Score Check सिबिल स्कोर ऑनलाईन असा चेक करायचा फ्री मध्ये |
स्टेप 1. सर्वात आधी सिबिल वेबसाईट वरती जा. तुम्हाला खाली लिंक दिली आहे.

🌐 Website Link – येथे क्लिक करा

स्टेप 2. आता Get Your CIBIL SCORE या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3. आता जो फॉर्म तुमच्यासमोर त्याच्यात तुमची संपूर्ण माहिती न चुकता अचूक पद्धतीने भरायचे त्यानंतर पुढे जा.

स्टेप 4. आता तुमचे एक अकाउंट तयार केले जाईल त्याच्या तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल. अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या ईमेल वरती एक मेल पाठवला जाईल त्याच्यात दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तुम्हाला सत्यापित करावे लागेल.

🌐 Website Link – येथे क्लिक करा

स्टेप 5. परत मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून सिबिलच्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या.

स्टेप 6. आता तुम्हाला काही सस्क्रिप्शन ची माहिती देण्यात येईल तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा सिव्हिल रिपोर्ट मिळवायचा असेल तर हे सबस्क्रीप्शन तुम्हाला घ्यावे लागेल. परंतु जर का तुम्ही फक्त वर्षातून एकदाच तुमचा रिपोर्ट पाहणार आहात तर तुम्ही फ्री मध्ये हे काम करू शकता त्यासाठी या गोष्टी तुम्ही टाळू शकता.

स्टेप 7. आता तुमच्या पॅन कार्ड नंबर सह तुमची अतिरिक्त माहिती भरा त्याचबरोबर तुम्ही तुमची पॅन कार्ड ची माहिती बरोबर टाकली आहे असे सुनिश्चित करा आणि तुम्ही जा.

स्टेप 8. आता तुम्हाला तुमचे लोन व क्रेडिट संबंधित काही प्रश्न विचारले जातील ज्याच्या आधारावर तुमच्या सिबिल स्कोर ची पूर्तता केली जाईल व तुमचा क्रेडिट अहवाल तयार केला जाईल संपूर्ण उत्तर अचूक पद्धतीने द्या.

स्टेप 9. आता तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट तयार होताना दिसेल येथे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता तसेच तुमचा क्रेडिट रिपोर्ट अहवाल डाऊनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा CIBIL SCORE मोबाईल मधून सुद्धा चेक करू शकता (Cibil Score Check Free Online on Cibil.com in Marathi)