लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

ladaki bahin Yojana online apply : सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अटी

अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा हप्ता आता कमी मिळणार आहे. या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळणार आहे. राज्यात आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे छननीनंतर स्पष्ट झाले.नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहे. ladaki bahin Yojana online apply

लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. तसेच केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेचे वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहे. यामुळे या महिलांना आता वर्षाला राहिलेले सहा हजार रुपयेच लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे.

नमो किसान योजनेच्या धरतीवर पात्र महिलांना मिळणार 1500 रुपये

राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 1.75 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला आहे.

राज्यातील सर्व पात्र महिलांना आतापर्यंत पहिला हप्ता ३००० रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले आहे. काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिला हप्ता 3000 रुपये मानधन मिळाले आहे, तर काही महिलांना आतापर्यंत पहिला हप्ता मिळाला नाही, अशा लाभार्थींना कधी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार याबाबत सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये सविस्तर मिळणार आहे, तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी. ladaki bahin Yojana online apply

योजनेचे नाव महाराष्ट्र लाडकी बहीण योजना

  • सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • राज्य महाराष्ट्र
  • वर्ष २०२४
  • लाभार्थी राज्यातील गरीब आणि निराधार महिला
  • उद्दिष्ट गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
  • लाभ आर्थिक मदत प्रति महिना
  • आर्थिक मदत रक्कम ₹१५०० प्रति महिना
  • अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन
  • योजनेचा प्रारंभ दिनांक १ जुलै २०२४
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर २०२४
  • लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in
  • महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल NariDoot App
  • या महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये | Ladki Bahin Yojana 4500 Hafta
  • राज्यातील सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त महिलांनी आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून पहिला दोन महिन्याच्या हप्ता जमा केला आहे, अशा महिलांना आता सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मानधन मिळणार आहे.

अर्ज मंजूर झाले किंवा नाही पहा

अर्ज मंजूर झाले तरी नाही मिळाले लाडकी बहीण योजनेचा हफ्ता खूप साऱ्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत तरी पण त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हफ्ता हस्तांतरित करण्यात आले नाही, अशा लाभार्थींना महिलांना आता सरकारकडून सप्टेंबर महिन्यात तीन महिन्याच्या मिळून 4500 रुपये मानधन एकत्र त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तरी पण ज्या महिलांनी आतापर्यंत बँकेत केवायसी या आधार डीबीटी लिंक केले नसेल त्यांनी त्वरित आपलं खात लिंक करावे तरचं त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार.या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये ज्या लाभार्थी महिलांनी ऑनलाईन-ऑफलाइन किंवा अंगणवाडी सेविका कडे जाऊन अर्ज सप्टेंबर महिन्यात भरले असेल  अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून बँक खात्यात फक्त 1500 रुपये मानधन मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना नवीन नियम

अर्ज करण्यासाठी आता नवीन नियम  लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांना अर्ज करण्याची आहे त्यांना आता आँनलाईन वेबसाईट पोर्टल वर अर्ज दाखल करता येणार नाही. अर्ज करण्यासाठी आता जबाबदारी संपूर्णपणे अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका यांना आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहे. या बदलासाठी शासनाने नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया ज्या महिलांनी अद्याप लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला नाही, त्यांना आता पुढील प्रमाणे अर्ज करावा:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची यादी तपासण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करू शकता

1. अधिकृत वेबसाइटवरून तपासणी:

  • योजनेची अधिकृत वेबसाइट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  • येथे आपला अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक वापरून अर्जाची स्थिती तपासू शकता.

2. ‘नारी शक्ती दूत’ अ‍ॅपचा वापर:

  • प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’ अ‍ॅप डाउनलोड करा.
  • अ‍ॅपमध्ये आवश्यक माहिती भरून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा पर्याय निवडा.
  • येथे लाभार्थी यादीत आपले नाव आहे की नाही, ते तपासू शकता.

3. जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात संपर्क:

  • आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अपात्र यादीबाबत माहिती मिळवू शकता.

अपात्र ठरण्याची मुख्य कारणे:

  • वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असणे.
  • कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असणे.
  • सरकारी कर्मचारी असणे.
  • इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असणे.
  • आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे.
  • आयकर विवरणपत्र (ITR) भरलेले असणे.

अपात्र ठरल्यास काय करावे?

  • जर आपण अपात्र ठरवले गेले असाल आणि त्याबाबत आपल्याला शंका असेल, तर संबंधित कागदपत्रांसह आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा.
  • तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता पुनः तपासण्याची विनंती करू शकता.

अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी, आपल्या स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

Leave a Comment