लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

ladki bahin yojana : मित्रांनो आपल्याला तर माहित आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ज्या योजनेचा लाभ सामान्य लोकांनी घेतला आणि विशेषतः महिलांनी घेतला अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

या योजनेबद्दल राज्य सरकारकडून पण मोठ मोठ्या घोषणा केल्या गेल्या. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये क्रेडिट केले जातात. विधानसभा इलेक्शनच्या प्रचारादरम्यान राज्य सरकारने सांगितले होते की आम्ही हे रक्कम वाढवून 2100 रुपये करू आणि त्यापुढेही जाऊन सांगितले होते की असंच चालू राहिल्यास आम्ही ही रक्कम 3000 पर्यंत करू.

महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे 1500 रुपयावरून 2100 रुपये कधी होतात याची आता वाट पाहावी लागत आहे. सध्या 2100 रुपये वाढवण्या संदर्भात राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. आणि त्यामध्ये आता नवीन गोष्ट अशी म्हणजे लाभार्थी असलेल्या सर्व महिलांचे आता पुन्हा एकदा पडताळणी सुरू केलेली आहे.पडताळणी सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. ladki bahin yojana

नियमाप्रमाणे

जर महिलांच्या घरी चार चाकी वाहन असेल, तर अशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे आधीच सांगितलेले होते. परंतु तरीही काही महिलांनी अर्ज भरलेले आहेत. आता अशा सर्व महिलांची पडताळणी सुरू केलेली आहे. पडताळणी करून आता लाडक्या बहिणींची नावे पात्रता यादी मधून वगळण्याची सुरुवात झालेली आहे.

पडताळणी सुरू

झालेले यामध्ये मुख्यतः चार चाकी वाहन असणं त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी असणं त्यानंतर नमो शक्ती या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या महिलांची नावे आता वगळण्यात येत आहेत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर महिला ह्या लाभार्थी आहेत याची संख्या दोन कोटी 59 लाख एवढी आहे. ladki bahin yojana

लाभार्थी महिलांना

दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे म्हणजे सरकारी खात्यातील 385 कोटी रुपये हे द्यावे लागतात. या योजनेच्या नियमानुसार अशाच महिलांना लाभ घेता येईल. ज्या महिलांकडे चार चाकी नाही, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहेत तसेच त्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही अशाच सर्व महिलांना लाभ मिळणार होता.

अपात्र महिलांची नावे

आता असं झालं आहे की काही महिलांना इतर योजनांचा पण लाभ मिळतो आणि माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळतो आता, अशाही महिलांची पडताळणी होणार आहे.राज्य सरकारने ही कारवाई सुरू केल्यापासून पाच लाख 40 हजार एवढे अपात्र महिलांची नावे समोर आलेली आहेत. आता ही पडताळणी किती दिवस चालेल याचा काही राज्य सरकार तर्फे सांगण्यात आलेलं नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल या संदर्भातही काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ज्य शासनाने अंगणवाडी सेविकांकडे याद्या दिलेल्या आहेत. येणाऱ्या आठ दिवसांमध्ये याचा अहवाल शासनाला त्यांना सादर करायचा आहे. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच फेब्रुवारी महिन्याचे पैसे पडतील अशी शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर पडत असलेल्या तानामुळे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ सध्या थांबवला गेला आहे.

महिलांची नावे या योजनेमध्ये बसत नाहीत किंवा अपात्र आहेत

अशा सर्वच महिलांची पडताळणी होईल त्यामुळे जोपर्यंत पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत फेब्रुवारी चे पैसे खात्यामध्ये जमा होतील की नाही यासंदर्भात आता अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.लाडकी बहीण योजनेचा आता इतर योजना नाही फटका बसत आहे. महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाच्या सन 2024-25 च्या अंदाजपत्रकानुसार आता राज्यातील सर्व विविध विभागांना त्यांच्या खर्च करण्याच्या मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. आणि एकूण तरतुदीच्या फक्त 70 टक्केच रक्कम तुम्ही खर्च करू शकतात अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी सामाजिक योजना आहे, ज्याचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  • दरमहा आर्थिक मदत: पात्र महिलांना दरमहा ₹1,500 ची थेट आर्थिक मदत त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • लाभार्थ्यांची संख्या: या योजनेचा लाभ सुमारे 1 कोटी महिलांना मिळणार आहे.
  • योजनेचा प्रारंभ: या योजनेची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.

पात्रता निकष

  1. वय: 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला.
  2. वास्तव्य: महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
  3. आर्थिक स्थिती: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  4. इतर अटी:
    • महिला आयकरदाता नसावी.
    • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा निवृत्तिवेतनधारक नसावा.
    • कुटुंबाकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नसावे.
    • कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र / मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उत्पन्नाचा दाखला (पिवळे/केशरी रेशन कार्ड असल्यास आवश्यक नाही)
  • हमीपत्र (अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत)

अर्ज प्रक्रिया

  1. ऑनलाईन अर्ज: https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करा.
  2. इतर माध्यमे:
    • ‘नारी शक्ती’ मोबाईल अॅप सेतू सुविधा केंद्रे
    • अंगणवाडी केंद्रे
    • ग्रामपंचायत कार्यालयेवार्ड ऑफिसेस
  3. अर्जाची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

 अलीकडील घडामोडी

  • गैरवापराचे प्रकरण: तपासणीत असे आढळले की, सुमारे 2,652 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून एकूण ₹3.58 कोटींची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राजकीय प्रतिक्रिया: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी वेळेअभावी सर्व अर्जदार महिलांना लाभ देण्यात आला, ज्यामुळे काही अपात्र महिलांनाही लाभ मिळाला. यामुळे विरोधकांनी या योजनेवर “मतदारांना लाच” असा आरोप केला आहे.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

 

Leave a Comment