Pm kisan : PM किसान योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी आता प्रतीक्षेत आहेत की PM योजनेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नेमकी कोणती तारीख आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने वेगवेगळे योजना लागू केलेले असतात त्यांना आर्थिक अनुदान देण्यात येत असतात पिक विमा देत असतो यामध्ये शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळत असतो परंतु तुम्हाला माहित आहे का पीएम किसन योजना आणि त्याच प्रमाणे नमो शेतकरी योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास वर्षाचे 12000 मिळतात आणि नमो शेतकरी चे तीन हप्ते आणि पीएम किसान ची तीन हप्ते प्रत्येक हप्ता हा तोड दोन हजार रुपयांचा असतो अशी एकूण त्यांना वर्षाचे 12000 रुपये मिळतात. Pm kisan
शेतकऱ्यांना थोडासा दिलासा
पीक विमा देखील त्यांना मिळत असतो कारण शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून असताना हवामानाने साथ दिली तर त्यांच्या पिकाला भाव नसतो आणि पीक चांगलं आले तर ती विकण्यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर अडचण येत असतात त्यामुळे शेतकरीला सरकार वेळोवेळी अनुदान देत असते या संदर्भात एक मोठे अपडेट आहेत की आता प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे बघूया पूर्ण माहिती.केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. Pm kisan
शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात
केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकर्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून देशभरातली कोट्यवधी शेतकर्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा होत आहेत.या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो. या योजनेतंर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यात प्रत्येकी 2-2-2हजार रुपये जमा करण्यात येतात. शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येतात. शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहे.
20 वा हप्ता सुद्धा लवकरच खात्यात जमा
20 वा हप्ता कधी जमा होणारपीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत 20 वा हप्ता लवकरच जमा होईल. आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकर्यांच्या खात्यात जमा होतील. केंद्र सरकार दर चार वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करते. प्रत्येकी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापूर्वी 18 वा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. हा पॅटर्न लक्षात घेता 20 वा हप्ता हा जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे.
PM किसान योजनेत नियम एक मोठा बदल
या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे. इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झाले आहेत.तुमचे नाव यादीत आहे का?पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळेल की नाही, यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल. शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासू शकतात. शेतकरी सरकारची अधिकृत साईट pmkisan.gov.in वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरा:
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. “Farmers Corner” विभागात जा
- होमपेजवर उजव्या बाजूला असलेल्या “Farmers Corner” विभागात “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा.
3. आपली माहिती भरा
- तुमच्या राज्य, जिल्हा, उप-जिल्हा (तालुका), ब्लॉक आणि गाव यांची निवड करा.
4. “Get Report” वर क्लिक करा
- सर्व माहिती भरल्यानंतर “Get Report” या बटणावर क्लिक करा.
5. यादी तपासा
- तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. या यादीत तुमचे नाव, वडिलांचे नाव, लिंग, आणि पत्ता यांसारखी माहिती असेल.
वैयक्तिक लाभार्थी स्थिती कशी तपासायची?
1. “Beneficiary Status” तपासा
- https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर “Farmers Corner” विभागात “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.
2. आवश्यक माहिती भरा
- तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यापैकी एक माहिती भरा.
3. “Get Data” वर क्लिक करा
- माहिती भरल्यानंतर “Get Data” या बटणावर क्लिक करा.
4. तुमची स्थिती तपासा
- तुमच्या अर्जाची स्थिती, मंजूर झालेल्या हप्त्यांची माहिती, आणि इतर संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल.
महत्त्वाचे सूचना
- e-KYC पूर्ण करा: योजनेचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. हे https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंकवर जाऊन करू शकता.
- Aadhaar आणि बँक खाते लिंक करा: तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्ज स्थिती तपासा: जर तुमचे नाव यादीत नसेल, तर “Know Your Status” विभागात जाऊन अर्जाची स्थिती तपासा.
- अर्ज क्रमांक विसरल्यास: जर तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक विसरलात, तर “Know Your Registration Number” या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाच्या मदतीने तो मिळवू शकता.
अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी, आपल्या स्थानिक कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा.