PM Mudra Loan yojana

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) म्हणजे काय?

अधिकृत वेबसाईट Click Here

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या अंतर्गत, कृषी क्षेत्राव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळवून देणाऱ्या लहान उद्योगांना आणि व्यवसायांना ₹ 20 लाखांपर्यंतचे कर्ज पुरवले जाते. हे कर्ज विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध आहे, ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, खाजगी बँका, परदेशी बँका, सूक्ष्म वित्त संस्था (Micro Finance Institutions – MFIs) आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (Non-Banking Financial Companies – NBFCs) यांचा समावेश होतो..

अधिकृत वेबसाईट Click Here

आवश्यक कागदपत्रे
मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे तुम्ही घेत असलेल्या कर्जाच्या प्रकारानुसार (आणि रकमेनुसार) बदलू शकतात. खालील कागदपत्रे सामान्यतः आवश्यक असतात:

शिशु कर्ज (₹ 50,000 पर्यंत): ओळखपत्र, निवास प्रमाणपत्र, अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे नवीन फोटो, व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा आणि खरेदी करायच्या असलेल्या मशीनरी किंवा इतर सामग्रीचे कोटेशन. PM Mudra Loan
किशोर/तरुण कर्ज (₹ 50,000 ते ₹ 20 लाख): ओळखपत्र, निवास प्रमाणपत्र, अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे नवीन फोटो, व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा, खरेदी करायच्या असलेल्या मशीनरी किंवा इतर सामग्रीचे कोटेशन, मागील दोन वर्षांचे ऑडिट केलेले बॅलन्स शीट (जर व्यवसाय आधीपासून चालू असेल तर) किंवा नवीन व्यवसायासाठी एका वर्षाचा प्रोजेक्टेड बॅलन्स शीट.

 

 

निष्कर्ष
प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना (PM Mudra Yojana In Marathi) हि देशातील करोडो लोकांसाठी वरदान बनलेली आहे. जे व्यक्ती स्वतःचा उद्योग करण्यासाठी धडपड करत होते मात्र त्यांना आर्थिक अडचणीमुळे ते पाऊल उचलणे शक्य झाले नाही. त्यांना या योजनेने सुवर्ण संधी दिलेली आहे. आज महाराष्ट्र सहित संपूर्ण देशात अनेक उद्योजक या योजनेमुळे घडले आहेत.

आता उद्योजक बनण्याचा नंबर तुमचा आणि तुमच्या मित्राचा आहे. मित्रांनो हीच मोठी संधी आहे, या संधीचे सोने करून स्वतःचा उद्योग सुरु करण्याची हीच वेळ आहे. लवकरात लवकर सरकारच्या या मुद्रा योजनेचा अर्ज भर आणि स्वतःचा उद्योग सुरु करा, धन्यवाद.

FAQs
Que: मुद्रा लोन साठी काय काय कागदपत्रे लागतात?
Ans- मुद्रा लोन योजना खास युवकांसाठी अधिक फायदेमंद राहणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जन्माचा दाखला, बँकेचे खातेबुक,दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, उद्योग आधार, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो आणि दाटीचा दाखला हि कागदपत्रे लागणार आहेत.

Que: मुद्रा कर्जावर किती व्याजदर आहे?
Ans- प्रधानमंत्री मुद्रा योजना मधून उद्योगासाठी कर्ज काढले असता त्यावर प्रति वर्ष 9% ते 12% पर्यंत व्यदर राहणार आहे. घेतलेले कर्ज हे सात वर्षापर्यंत फेडण्याची मुदत सुद्धा राहणार आहे.

Que: मुद्रा कर्जांसाठी किती सिबिल स्कोअर आवश्यक आहे?
Ans– सरकारने आखून दिलेली निकषांनुसार प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्याकरिता कुठल्याही सिबिल स्कोअर ची आवश्यकता नाही आहे. बिना सिबिल स्कोअर ने सुद्धा योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु जर चांगला सिबिल स्कोअर असेल तर ते अधिकच फायदेमंद सुद्धा राहणार आहे.

Que: मुद्रा कर्जासाठी उद्यम नोंदणी आवश्यक आहे का?
Ans– कुठल्याही उद्योग कर्ज काढण्यासाठी उद्यम नोंदणी हे अनिवार्यच राहत असते. त्याचप्रकारे मुद्रा कर्जासाठी सुद्धा तुमचा उद्योग नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अर्ज भारत असताना नोंदणी क्रमांक सुद्धा टाकावा लागतो. मागील बारा महिन्यामध्ये खाते SMA 2 श्रेणी अंतर्गत नसावे.